DAGDANE MARHAN

पत्नी किर्तनाला गेली म्हणून पतीची कीर्तनात दगडफेक!

परळी दि.7 : पत्नी किर्तन ऐकायला गेली म्हणून संतप्त झालेल्या पतीने भरकिर्तनात दगडफेक व तलवारबाजी करून गोंधळ घातल्याचा प्रकार तालुक्यातील मालेवाडी येथे घडला आहे. या प्रकारात मारहाण झालेल्या पत्नीसह सोडवासोडवी करणार्‍या चार जणांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी या पीडितेच्या पती विरोधात फिर्याद दाखल केली असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.6) गुन्हा दाखल करण्यात आला […]

Continue Reading
ACB TRAP

महावितरणच्या कनिष्ठ लिपीकासह एजंट एसीबीच्या जाळ्यात!

परळी दि.1 : वीजबिल भरणा नियमित केल्यानंतरही बिलावर थकबाकी दिसते, व्यावसायिक मिटरचा प्रकार असताना औद्योगिक वीजाकारणी होणे आदी तांत्रिक बाबी पुर्ण करून वीजबिलाचे दुरुस्तीचे वरिष्ठांकडून काम करुन देण्यासाठी तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. ती स्विकारतान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून परळी महावितरण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व एक खाजगी एजंटवर गुरुवारी (दि.1) कारवाई केली. परळी […]

Continue Reading

राखेची वाहतूक करणारे हायवा महिलांनी अडवून चालकांना दिला चोप; रस्त्यावर सांडलेली राख चालकांकडून शर्टने घेतली पुसून

गोपीनाथ गडावरील महिला आक्रमक परळी- आज बीड जिल्ह्यात गोपीनाथ गडावरील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत राखेची वाहतूक करणारे हायवा अडवले. त्यातील चालकांना चपलेचा प्रसाद देत त्यांच्याकडून स्वतःचे शर्ट काढायला लावत रस्त्यावर सांडलेली राख पुसून घ्यायला लावली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल आहे. अधिक माहिती अशी की, परळीचा औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या वाहतुकीमुळे आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ हैराण झाले […]

Continue Reading

सिरसाळा ठाण्यात एसीबीची कारवाई

सिरसाळा दि.23 : राखेची वाहतूक करण्यासाठी तीन टिप्पर चालू देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच खाजगी इसमामार्फत स्विकारली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यासह खाजगी इसमावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि.23) दुपारी उस्मानाबादच्या एसीबीने केली. उमेश यशवंत कनकावार, गजानन अशोक येरडलावर (दोघे पोलीस शिपाई नियुक्ती सिरसाळा पोलीस स्टेशन) व खाजगी इसम नदीम […]

Continue Reading

आप्पासाहेब जाधव शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख!

बीड दि.22 : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी आप्पासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली आहे. सचिन मुळक यांना हा अनपेक्षित धक्का मनाला जात आहे.शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बीड व लातूर येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये माजलगाव, परळी, केज विधानसभा जिल्हाप्रमुखपदी आप्पासाहेब कडाजीराव जाधव यांची निवड करण्यात आली. तर उपजिल्हाप्रमुखपदी गणेश वरेकर, […]

Continue Reading
crime

डॉक्टरचा पराक्रम; एकीकडून हुंडा घेत दुसरी सोबत केले लग्न

परळी शहर पोलीसात फसवणूकीचा गुन्हापरळी: दि.19 : तुमच्या मुलीसोबत लग्न करतो, मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या असे म्हणून वैद्यकीय अधिकार्‍याने परळीतील मुलीसाठी तिच्या कुटुंबीयांकडे मागणी घातली. मात्र साखरपुडा झाला, हुंडा दिल्यानंतर त्याने परस्पर दुसर्‍याच मुलीशी लग्न केल्याच्या आरोपावरून त्या वैद्यकीय अधिकार्‍यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. डॉ. संदीप वसंतराव मंत्रे (रा. सोमेश्वरनगर, परळी) […]

Continue Reading

परळीतील नामांकीत कपड्याने दुकान सील!

परळी दि.26 : कोरोनाच्या वाढत्या प्र्रादुर्भावामुळे जिल्ह्यात सध्या कडक लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. मात्र परळी शहरात छुप्या पद्धतीने दुकानदार आपली दुकाने सुरूच ठेवत आहेत. शटर खाली ओढून दुकानात गर्दी करतांना दिसून येत आहेत. बुधवारी सामंत कपड्याचे दुकान उघडे असल्यामुळे सील करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड […]

Continue Reading

भिकार्‍याचे दोन लाख चोरट्यांनी पळवले, पोलीसांनी तीन तासात शोधून परत केले!

परळी दि.25 : आयुष्यभर भीक मागून पै-पै जमवलेल्या जवळपास पावणेदोन लाख रुपयांच्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला… पैसे चोरी गेल्याने चिंताग्रस्त भिकार्‍याची मदतीसाठी खाकीतला देव उभा राहिला. अन् अवघ्या तीन तासात चोरट्यांना पकडून भिकार्‍याला त्याची रक्कम सही सलामत सुपूर्द केली. याबद्दल पोलीसांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. बाबुराव नाईकवाडे असे त्यांचे नाव आहे. मागील अनेक वर्षांपासून […]

Continue Reading
DHANANJAY MUNDE

ना. धनंजय मुंडेंनी प्रत्येक खासगी रुग्णालयात ठेवले दोन स्वयंसेवक

सेवाधर्मासाठी सुक्ष्म नियोजन : रुग्णांची देखभाल, भोजनव्यवस्था, इंजेक्शनसाठी परळीतील प्रत्येक रुग्णालयात दोन स्वयंसेवक नियुक्त धनंजय मुंडेंकडून महिलांसाठी 100 बेडचे स्वतंत्र कोविड केअर सेंटर परळी, दि. 10 : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील वाढत्या कोरोना रुग्णासंख्येविरुद्ध कंबर कसली आहे. ना. मुंडेंच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परळीत सुरू केलेला सेवाधर्म […]

Continue Reading