तुकाराम मुंडेंचं महाराष्ट्रावर लक्ष पण स्वतःच्या बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष

– दुधात भेसळ करण्याचा प्रकार सुरूच– 1800 किलो व्हे पावडरचा साठा पोलीसांनी पकडलाप्रतिनिधी । बीडदि.20 : बीडचे भुमीपूत्र तथा अन्न औषधी प्रशासनाचे आयुक्त आयएएस तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवायांनी भेसळ माफीयांना धडकी भरवलेली आहे. त्यांनी पुणे-मुंबई सह इतर शहरात दुधात भेसळ करणार्‍यांवर कारवाया केल्या. मात्र अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राला केमीकल युक्त दूध पुरवणार्‍या बीडच्या आष्टीत मात्र […]

Continue Reading
NAVNEET KAVANT

फरार, पाहिजेत आरोपी हद्दीमध्ये सापडल्यास ठाणेदाराची खैर नाही

-आरोपींना जेरबंद करण्यासाठी एसपी नवीनत काँवतांचा उपक्रम प्रतिनिधी । बीड दि.20 ः पाहिजेत, फरार आरोपी जर जास्तकाळ ठाणेच्या हद्दतीच असल्याची माहिती एसपींना मिळाली, त्यांनी पाठवलेल्या पथकाला सदरील आरोपी सापडला तर संबंधित ठाणेदारावर मात्र कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे. तसेच आरोपीबाबत खोटी माहिती देणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांचीही जबाबदारी निश्चित करून […]

Continue Reading
BEED CIVIL HOSPITAL

कोण खरं अन् कोण खोटं? चौकशी समितीच्या अहवालानंतरच कळणार

– हातमोजे, टिश्शू पेपर नव्हे तर महिलेच्या पोटात कापशी पट्टी– ससून रूग्णालयातील डॉक्टरांची टोलवाटोलवी  प्रतिनिधी । बीडदि.19 : जिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान 19 वर्षीय महिलेच्या पोटात गॉज (कापशी पट्टी) राहिल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे पुन्हा शस्त्रक्रिया करून पोटातून गॉज काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला. […]

Continue Reading

वाल्मिक कराडला नागपूर किंवा चंद्रपूरच्या कारागृहामध्ये हलवा!

धनंजय देशमुखांची कारागृह महानिरीक्षकांकडे तक्रारप्रतिनिधी। बीडदि.18 ः मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहातून नागपूर किंवा चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात यावे, अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कारागृह महानिरीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, कराडला कारागृहात नियमबाह्य सुविधा दिल्या जात असल्याचा तसेच […]

Continue Reading
BEED CIVIL HOSPITAL

चक्क महिलेच्या पोटात डॉक्टर विसरले हातमोजे आणि रुमाल

बीड जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; सिझेरियननंतर दोन दिवसांत प्रकृती बिघडलीप्रतिनिधी। बीडदि.18 ः बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या 19 वर्षीय महिलेच्या सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटात हातमोजे आणि रुमाल राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन दिवसांत महिलेची प्रकृती बिघडली. पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या पोटात संसर्ग होऊन आतडे सडल्याचे आणि गर्भाशय खराब […]

Continue Reading

बीड : वाळू वाहतुकीसाठी 70 हजारांची लाच घेणारा पकडला!

केशव कदम दि.18 : जिल्ह्यात अवैध वाळू उपशाचा मुद्दा गाजत असतानाच अवैध वाळू वाहतुकीसाठी सहकार्य करण्याच्या मोबदल्यात 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना गेवराई तालुक्यातील तलाठ्याला छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.18) रंगेहाथ पकडले. विलास राजेंद्र मोराळे असे कारवाई झालेल्या तलाठ्याचे नाव असून ते गेवराई तालुक्यातील खामगाव सज्जा येथे कार्यरत होते. अवैध वाळू […]

Continue Reading

बीड जिल्ह्यात ऊसामध्ये गांजाची शेती!

पोलिसांच्या कारवाईत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त वडवणी दि.18 : तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी येथे ऊस आणि कापसाच्या पिकाच्या आड गांजाची लागवड केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांच्या कारवाईत गांजाची तब्बल ११६ झाडे आढळून आली. सहा ते सात फूट उंचीच्या या झाडांची किंमत अंदाजे ५० लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.हरिश्चंद्र पिंपरी येथील संदीपान विठ्ठलराव शिंदे (वय […]

Continue Reading
acb office beed

बीड: तीन हजारांची लाच घेताना लाचखोर पकडला!

केशव कदम बीड दि.7: जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच एका ग्रामरोजगार सेवकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. पीएम घरकुल योजनेअंतर्गत मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी एका मस्टरमागे १०० रुपये या प्रमाणे ३० मस्टरसाठी एकूण ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामरोजगार सेवक गोविंद सोपान गोरे (वय ५०, रा. बनसारोळा, ता. केज, […]

Continue Reading

एपीआय सोनवळे यांचा मुरुम माफियांना दणका!

एक कोटींचा मुद्देमाल जप्त; तिघांविरुद्ध बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा बीड दि.4 : बीड ग्रामीण पोलिसांनी अवैध गौण खनिज साठवणूक व वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत जेसीबी, दोन हायवा टिप्परसह तब्बल १ कोटी २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास सोनवळे यांच्या नेतृत्वाखाली […]

Continue Reading

बीडच्या लाचखोर वन अधिकाऱ्याच्या घरी सापडले रोख रक्कम अन् दागिने!

नांदेड येथील निवासस्थानी एसीबीची झडती; पुढील तपास छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केशव कदम | बीडदि.1 : ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड यांच्या नांदेड जिल्ह्यातील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) झडती घेतली. या कारवाईत १ लाख ७ हजार रुपयांची रोकड आणि सुमारे ३ […]

Continue Reading