कृषी विधेयक; चर्चेसाठी शेतकर्‍यांनी मध्यरात्री देखील यावे, स्वागत आहे

देश विदेश न्यूज ऑफ द डे शेती

नवी दिल्ली : संदसेत तीन कृषी विधेयक मंजूर केल्यानंतर केंद्र शासनाविरोधात देशभरातील विरोधी पक्षांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. विरोधकांनी ‘भारत बंद’चे आवाहन करण्यात आल्यानंतर आता कृषी व शेतकरी कल्याण केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी महत्वपूर्ण आवाहन करण्यात आले आहे.

नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी विधेयकाबद्दल भुमिका मांडताना म्हटले की, देशात नरेंद्र मोदी सरकारने कृषी विधेयक मंजूर करून शेतकर्‍यांना मोठा लाभदायी ठरणारा निर्णय घेतला. परंतू विरोध या मुद्द्याचे राजकारण करत आहेत. शेतकर्‍यांच्या मुद्द्यातही विरोधकांकडून राजकारण सुरु आहे हे ही बाब निंदणीय आहे. देशातील कोणत्याही शेतकर्‍याला सरकारच्या प्रतिनिधींसमवेत कृषी विधेयकावर चर्चा करायची असेल तर मध्यरात्री देखील आम्ही तयार आहोत, आमच्यावतीने सर्व शेतकर्‍यांना नम्रतेने आमंत्रित करत आहोत, चर्चेसाठी कधी या असे आवाहन करण्यात आले असून विरोधकांच्या राजकारणाला बळी पडू नका असेही म्हटले आहे.

Tagged