cricket team

बिडकीन येथे क्रिकेटवर सट्टा घेणार्‍यावर छापा

क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा

औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची कारवाई

पैठण : तालुक्यातील बिडकीन येथे एका हॉटेलसमोर क्रिकेट सट्टा घेणार्‍यावर ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या पथकाने छापा मारून चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

   सध्या आयपीएल क्रिकेट सामने सुरू आहेत. या संधीचा फायदा घेऊन बिडकीनमधील मराठा हॉटेल समोर क्रिकेट वर सट्टा चालू असल्याची खबर ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या पथकाला मिळाली. विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक जाधव यांनी आपल्या सहकार्‍यांसह सापळा लावून क्रिकेटवर सट्टा चालविणारा अजय श्रीकिसान लाडवाणी (रा.हांडे गल्ली बिडकीन) याला सट्ट्यावर पैसे घेताना रंगेहात पकडले. त्याच्याजवळून एक मोबाईल सट्ट्यासाठी लागणारे साहित्य व 35 हजार 900 रुपये जप्त केले करण्यात आले. याबाबत बिडकीन पोलिस ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक विवेक जाधव यांच्या तक्रारीवरून आरोपी अजय श्रकिशन लाडवाणी याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरधारी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.बोडले पुढील तपास करीत आहे.

Tagged