बीड नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

न्यूज ऑफ द डे बीड

आमदार संदीप क्षीरसागर यांना झटका
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक असलेले चार नगरसेवक माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि.29) शिवसेनेत दाखल झाले आहेत. हा आमदार संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का मानला जात आहे.

नगरपालिकेतील रणजित बनसोडे, सीता भैय्यासाहेब मोरे, गणेश तांदळे यांच्या मातोश्री कांताबाई बन्सीधर तांदळे आणि प्रभाकर पोकळे यांनी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर, दिलीप गोरे, बाळासाहेब गुंजाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान, यापूर्वी नगरसेवक पती बाळासाहेब गुंजाळ यांनी देखील आमदार क्षीरसागर यांची साथ सोडली होती. तेव्हापासून त्यांच्या गोटात अस्थितरता पसरलेली होती. आज शिवसेनेत दाखल होत असलेले नगरसेवक गेल्या अनेक दिवसापासून प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते. विधानसभा निवडणुकीतील प्रमुख शिलेदार आ.क्षीरसागरांची साथ सोडत असल्याने त्यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.

Tagged