पुणे : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’मध्ये काम करणारे अभिनेते ज्ञानेश माने यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. रोटी घाटातून पुण्याला येत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. त्यानंतर उपचारासाठी त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
ज्ञानेश हे मुळचे बारामतीतील झारगडवाडी येथील होते. ते पेशाने डॉक्टर होते पण अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, भावजया असा परिवार आहे. ज्ञानेश यांच्या निधनानंतर कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत ज्ञानेश यांनी नितीश चव्हाणसोबत आर्मी ऑफिसरची भूमिका साकरली होती. त्याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये सोलापूर गँगवॉर, काळुबाईच्या नावानं चांगभलं, अंबुज, हंबर्डा, पळशीची पीटी या चित्रपटांचा समावेश आहे. ज्ञानेश यांच्या निधनानंतर कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे.