उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे राजकारण

राजकीय वातावरण ढवळून निघणार

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे शुक्रवारी (दि.८) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

अजित पवार हे मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ८ वाजता प्रयाण करतील. ते लातूर येथे पोहचल्यानंतर वाहनाने केज तालुक्यातील आनंदगाव सा. येथील येडेश्वरी साखर कारखान्यातील डिस्टीलरी प्रकल्पाच्या उद्घाटनास सकाळी १०.३० वाजता हजेरी लावतील. त्यानंतर दुपारी २ वाजता अंबाजोगाई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. त्यानंतर ते लातूर मार्गे परत जातील. अजित पवार यांच्यासोबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे देखील असणार आहे. जयंत पाटील हे येडेश्वरी साखर कारखान्यावरील कार्यक्रमानंतर आष्टी येथे ३.१५ वाजता राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमास जाणार आहेत. त्या ठिकाणी मतदारसंघाचे आढावा बैठक झाल्यानंतर वाहनाने येथून जामखेडकडे जातील. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजशिष्टाचार विभागाकडून देण्यात आली आहे.

Tagged