बीडमध्ये एसीबीच्या अधिकार्‍यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा!

बीड दि.14 : बीड एसीबी कार्यालयातील तत्कालीन पोलीस निरीक्षक हा लाचेची मागणी करत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी एसीबीच्या महासंचालक यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार करण्यात आली होती. अखेर या प्रकरणात सोमवारी (दि.14) त्या अधिकार्‍यावर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक हजार रुपयांची लाच घेताना एप्रिलमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधकरणच्या शाखा अभियंत्याला पकडले […]

Continue Reading

इच्छा नसतानाही अनेकांना करावी लागतेय विनंती!

बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्याही बदलीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कोरोना काळात रस्त्यावर न उतरणे, कुठल्याही गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट न देणे, राजकीय नेत्यांना फेस करता न येणे, अशा अनेक प्रकारामुळे वारंवार पालकमंत्र्यांची अडचण होत आहे. त्यामुळे नव्या एसपींचा देखील शोध सुरु असल्याची माहिती आहे.

Continue Reading

वाहने चोरी करणारी टोळी एलसीबीने केली गजाआड!

चोरीच्या दोन चारचाकीसह आठ दुचाकी जप्त बीड दि.11 : जिल्ह्यात वाहनचोरांचा धुमाकूळ सुरु असतानाच बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत आणि पथकाला जिल्ह्यासह परजिल्ह्यातील वाहने चोरणार्‍या टोळीला गजाआड करण्यात यश आले आहे. चोरट्यांकडून दोन चार चाकी व आठ दुचाकी असा एकूण 13 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात वाहनचोरीच्या […]

Continue Reading

आनंदाची बातमी! राज्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला

बीड दि.3 : ज्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के आहे. आणि ऑक्सिजनची उपलब्धतता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरु होतील अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पाहिल्या टप्प्यात राज्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवण्यात आले आहे. सर्वांसाठी ही दिलासादायक बातमी असून लवकरच बीड जिल्ह्याचेही लॉकडाऊन शिथील होणार आहे. राज्यात […]

Continue Reading

एक नव्हे दोन खुनातील मास्टर माईंड भैय्या गायकवाड जेरबंद!

नाशिक येथून घेतले ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेचे भारत राऊत यांची कामगिरीबीड/शिरुर दि.1 : शिरुर येथील सोनाराच्या खुनातील मास्टर माईंड ज्ञानेश्वर उर्फ भैय्या गायकवाड हा एका नव्हे तर दोन खुनातील मास्टर माईंड असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या भैय्या गायकवाडला मंगळवारी (दि.1) पहाटेच्या सुमारास नाशिक येथून जेरबंद करण्यात आले. ही कारवाई नाशिक पोलीसांच्या मदतीने स्थानिक […]

Continue Reading
arrested criminal corona positive

सोनार खून प्रकरणातील मुख्य आरोपी एलसीबीने केला नाशिकातून जेरबंद!

शिरुर : येथील सराफा व्यावसायीक विशाल कुल्थे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीस मंगळवारी (दि.1) पहाटे नाशिक येथून ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.भारत राऊत यांनी केली. यामध्ये त्यांना नाशिक पोलिसांनी मोठी मदत केली. शिरुर येथील विशाल कुल्थे या सराफा व्यापार्‍याचे अपहरण करुन त्याचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील मास्टर माईंड ज्ञानेश्‍वर […]

Continue Reading

मारहाणीत वरिष्ठांचा सहभाग अन् निलंबनाची कारवाई मात्र कर्मचार्‍यांवर!

जालन्यातील भाजप पदाधिकार्‍यास मारहाण प्रकरण जालना दि.28 ः जालना शहरातील एका खाजगीर रुग्णालयामध्ये रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती. यावेळी पोलीसांनी तिथे धाव घेत गोंधळ घालणार्‍यांना मारहाण करत गवळी समाजाबद्दल अपशब्द वापरले होते. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद करणार्‍या भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस शिवराज नारियलवाले याला डीवायएसपी, पोलिस निरीक्षक व अन्य कर्मचार्‍यांनी बेदम मारहाण […]

Continue Reading

सोन्यासाठी सोनाराचा केला प्रिप्लॅन मर्डर!

स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलीसांना प्रकरणाचा लावला छडा बीड दि.23 ः ‘माझं नविन लग्न झालं आहे. घाईगडबडीत सोने खरेदी करायचे राहून गेले.’ असं सांगत एका सराफाला सोन्याची ऑर्डर दिली. दागिणे घेऊन त्यास बोलावून घेतले. सलुनच्या दुकानात कोंडून त्याकडून दागिणे घेत त्याची निर्घणपणे हत्या केली. त्यानंतर मित्राच्या मदतीने दुचाकीवरुन त्याचा मृतदेह परजिल्ह्यात नेऊन शेतात पुरून […]

Continue Reading

बीड शहरात 57 बॉक्स देशी दारु जप्त!

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई बीड दि.21: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. अवैधरित्या होणार्‍या दारु विक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहेत. शुक्रवारी (दि.21) बीड शहरातील कब्बाडगल्ली येथून 57 बॉक्स देशी दारु जप्त केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकजण फरार आहे. […]

Continue Reading

डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

पुणे एसीबीची कारवाई बीड दि.20 : अ‍ॅट्रोसिटीच्या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी पाच लाखाची लाच मागून दोन लाख रुपये स्वीकारल्या प्रकरणी जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर आणि इतर दोन पोलीस कर्मचार्‍यांना पुणे आणि औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि.20) सकाळी करण्यात आली. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तक्रारदारास […]

Continue Reading