प्रमुख राजकीय पक्ष, संघटनांचे 7 ‘प्रदेशाध्यक्ष’ बीड जिल्ह्यातील!

न्यूज ऑफ द डे बीड

प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा! बीडची होतेय नवी ओळख

बीड : वंचित बहुजन आघाडीने नुकत्याच स्थापन केलेल्या ऊसतोड कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद बीड जिल्ह्यास मिळाले. त्यामुळे राज्य पातळीवरील संघटनात्मक पदांमध्ये भर पडली असून सध्या राज्यातील प्रमुख पक्ष, संघटनांचे 7 प्रदेशाध्यक्ष state president हे बीड जिल्ह्यातील आहेत. ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडची आता प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा अशी ओळख होवू लागली आहे. राज्याच्या राजकारणात जिल्ह्याचा दबदबा आहे. त्यामुळे बीडच्या वाट्याला संविधानिक पदांसह संघटनात्मक पदे देताना देखील झुकते माप दिले जाते.

     वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर prakash ambedkar यांनी बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची लाखोंची संख्या व त्यांच्या प्रश्नावरून साधता येणारे ‘राजकारण’ politics लक्षात घेऊन अलिकडे ‘विशेष’ लक्ष दिल्याचे दिसते. आधी संपात उडी घेतली व आता ‘वंचित’ प्रणित ऊसतोड कामगार आघाडी तीन दिवसांपूर्वी स्थापन केली. या आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बीडचे प्रा.शिवराज बांगर यांच्याकडे सोपविले. तसेच, शेतकरी चळवळीत जिल्हा अलिकडे मागे असला तरी राजकारणात असलेले बीडचे महत्व ओळखून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी Raju shetti यांनी गेवराईच्या पुजाताई मोरे pooja more यांच्याकडे संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दोन वर्षांपूर्वी दिली. समाजमाध्यमात त्यांची ‘क्रेझ’ असून मराठा क्रांती मोर्चा चळवळीत त्या सक्रिय असतात. तसेच, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले Ramdas aathwale यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे बीडचे पप्पू कागदे यांच्याकडे तब्बल 6 वर्षापासून युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. यापूर्वी त्यांचे नाव विधान परिषद सदस्य पदासाठी चर्चेत होते. आगामी काळात रिपाइंच्या कोट्यातून त्यांना संधी मिळू शकते. तसेच, अंबाजोगाई येथील डॉ.नरेंद्र काळे Dr.narendra kale हे तब्बल 8 वर्षापासून राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत. विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी त्यांचेही नाव चर्चेत होते. ते खा.शरद पवार, Sharad pawar सुप्रीया सुळे supriya sule यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्याच पक्षाचे शिरूर कासारचे महेबूब शेख हे वर्षभरापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी शिरूर नगरपंचायतीच्या वादात सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाठपुरावा केला. असा पाठपुरावा करणारे कदाचित ते जिल्ह्यातील पहिलेच युवा कार्यकर्ते असावेत. त्यांची युवा वर्गात ‘क्रेझ’ असल्याने विधानसभा निवडणूक प्रचारासाठी त्यांना पक्षाने ‘स्टार प्रचारक’ केले होते. ते पवार कुटुंबियांचे विश्वासू मानले जातात. तसेच, 10 वर्षापूर्वी राजकारणात सक्रीय असलेल्या दलित महासंघात फुट पडली आणि त्यातून डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाची कोल्हापूर येथे स्थापना झाली. संस्थापक अध्यक्ष सांगलीचे प्रा.सुकुमार कांबळे तर संस्थापक सदस्य बीडचे स्व.आत्माराम चांदणे हे होते. पुढे त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद आले. त्यांच्या पश्चात गत 3 वर्षापासून प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा त्यांचे सुपूत्र अजिंक्य चांदणे हे सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वात 20 जिल्ह्यात कार्यकारिणी असून दलित समाजाच्या विविध प्रश्नावर सातत्याने ते आवाज उठवततात. तिकडे परळीचे कन्हेरवाडीचे राजाभाऊ फड हे 5 वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत. ते वयाच्या 20 व्या वर्षापासून राजकारणात सक्रीय आहेत. त्यांच्या ताब्यात कन्हेरवाडी ग्रामपंचायत आहे. माजी मंत्री पंकजाताई मुंडे, pankaja munde महादेव जानकर, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान, यापैकी बहुतांश मंडळींना प्रस्थापित पुढार्‍यांच्या ‘राजकारणा’मुळे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय होता आलेले नाही.

प्रस्थापितांकडून अडवणूक
प्रदेशाध्यक्षांपैकी बहुतांश पदाधिकारी हे युवा आहेत. त्यांचे युवकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. रोजगार, बेरोजगारीसारख्या महत्वाच्या मुद्द्यावर बोलताना अथवा त्यांच्या समस्या जाणून घेताना कोणीही दिसत नाही. इतकेच नव्हे तर काही जण जिल्ह्याच्या प्रश्नाकडे कानाडोळा करताना दिसून येतात. या पदाधिकार्‍यांची प्रस्थापित पुढार्‍यांकडून अनेकदा अडवणूक होते.

https://karyarambh.com/

Tagged